Wednesday, June 3, 2026
Homeगडचिरोलीआरमोरीत गृहउ‌द्योग प्रशिक्षण बॅचच्या उ‌द्घाटनाचे आयोजन..

आरमोरीत गृहउ‌द्योग प्रशिक्षण बॅचच्या उ‌द्घाटनाचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी(अमृत)तर्फे मोफत गृहउ‌द्योग आरमोरी,जि. गडचिरोली येथे येत्या,मंगळवार १६ जून २०२६ रोजी गृहउ‌द्योग विषयाच्या प्रशिक्षण बॅचचे उद्घाटन करण्यात येणार आहे.स्थानिक युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच उ‌द्योजकता विकासाला चालना देणे हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.
सदर प्रशिक्षण बॅचमध्ये १५ प्रशिक्षणार्थी सहभागी होणार असून प्रशिक्षणाचा कालावधी २० दिवसांचा राहणार आहे.प्रशिक्षणादरम्यान गृहउ‌द्योगाशी संबंधित विविध कौशल्ये,व्यवसाय व्यवस्थापन,उत्पादन प्रक्रिया,विपणन तंत्रे तसेच स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे प्रशिक्षणार्थीमध्ये उ‌द्योजकतेची भावना विकसित होऊन त्यांना स्वावलंबी बनण्यास मदत होईल,असा विश्वास महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी(अमृत)ने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून,खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही.अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे.त्यामध्ये ब्राह्मण,कायस्थ,कोमटी/वैश्य,मारवाडी, पटेल,राजपूत,यलमार,अय्यंगार,राजपुरोहित, पाटीदार,नायर,नायडू,कम्मा, कानबी,सिंधी,बनिया, बंगाली,त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,ठाकूर,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे.अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  9112226527,9834323727,8208407357.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!