Saturday, April 18, 2026
Homeचंद्रपूरक्रूर-कृत्य…समाजात बदनामीच्या भीतीने; नवजात अर्भकास फेकले नाल्यात…-युवकास पोलीसांनी केली अटक..

क्रूर-कृत्य…समाजात बदनामीच्या भीतीने; नवजात अर्भकास फेकले नाल्यात…-युवकास पोलीसांनी केली अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- चिमुर तालुक्यातील बोडदा येथील हनुमान मंदिर परिसरासमोरील नाल्यात मृत नवजात अर्भक बुधवार दिनांक-१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास काही नागरिकांना आढळून आले.याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली.त्यानुसार घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी नवजात अर्भक ताब्यात घेतले.मृत अर्भक; बालिका असल्याने याप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू होता. त्यानुसार पोलिसांनी नवजात अर्भकाच्या मातेचा शोध घेऊन तिची चौकशी केली.अनैतिक संबंधातून झालेल्या नवजात बाळामुळे गावात व समाजात बदनामी होईल; या भितीने अर्भकाला नाल्यात फेकून दिल्याची कबुली मातेने दिली तसेच तिने दिलेल्या माहितीवरून अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी गावातील मोहीत मोहनलाल नागोसे वय २१ वर्षे युवकास पोलिसांनी आज दिनांक – ७ नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!