Thursday, October 22, 2026
Homeचंद्रपूरचोरांच्या उलट्या बोंबा..!ज्यांनी पकडुन दिली दारू ; त्यांच्यावरच केले गुन्हे दाखल…..महिलांनी गाठले...

चोरांच्या उलट्या बोंबा..!ज्यांनी पकडुन दिली दारू ; त्यांच्यावरच केले गुन्हे दाखल…..महिलांनी गाठले पोलीस अधीक्षक कार्यालय….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- शासकीय सेवेत असलेला कर्मचारी मागील अनेक वर्षापासून गावात सर्रास दारूविक्री करीत आहे.यामुळे गावातील युवा वर्ग व्यसनाच्या अधीन जात असल्याचे चित्र बघून गावातील संतप्त महिलांनी स्वतः त्या व्यक्तीच्या घरी जाऊन पोलिसांना दारू पकडून दिली.मात्र, पोलिसांनी उलट याच महिलांविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल केले असल्याने जणूकाही चोरांच्या उलट्या बोंबा..! असे दिसून येत असल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील पोस्टमन म्हणून कार्यरत रघुनाथ कोटनाके हे सर्रासपणे दारूविक्री करीत आहे.यामुळे गावातील युवा वर्ग व्यसनाकडे वळत असल्याचा आरोप करीत स्वातंत्र्यदिनी संतप्त झालेल्या महिलांनी धावा पोलिस स्टेशन गाठत ठाणेदार गोरक्षनाथ नागलोट यांना आरोपी कोटनाके याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.मात्र पोलिसांनी आपण दारू पकड़ा आम्ही कारवाई करतो,असे सांगितले.त्यामुळे महिलांनी कोटनाके याच्या घराकडे मोर्चा वळवला.कोटनाके याने रोजंदारी करणारा व्यक्ती संतोष तुमराम याला राहण्यासाठी जे खोली आहे तिथे दारूच्या पेट्या आढळल्या.याची माहिती पोलिसांना दिली.दारूच्या शंभर बाटल्या तिथे सापडल्या; मात्र पोलिस पंचनामा न करता आरोपी संतोष तुमराम आणि रघुनाथ कोटनाके यांना घेऊन जात होते. यावेळी महिलांनी आक्षेप घेतल्यावर अखेर पंचनामा करण्यात आला. यानंतर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) आणि ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. महिलांनी जबाबदार नागरिकांची भूमिका बजावली असताना आरोपीने खोटे आरोप करीत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी याच सामान्य २४ महिलांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६, ४२७ अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद केली. पोलिस अधीक्षकांनी याकडे त्वरित लक्ष घालून याची चौकशी करण्याची मागणी डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी ग्रा. पं. सदस्य सरस्वती आत्राम, माया आत्राम, माजी सरपंच उज्वला दुर्गे,मंगला कोकोडे,नलिनी कोटरंगे, सारिका कोटनाके, शिलिनी डोंगरे, वांदुशा सोनुले,कांता निवळकर, सुरेंद्र मांदाडे,ठाकरे आदी उपस्थित होते.

जिल्हा पोलिस अधीक्षक,रवींद्रसिंह परदेशी,चंद्रपूर 👇

महिलांनी दारू पकडून दिली ही बाब प्रोत्साहनपर असली, तरी त्यांनी कायदा हातात घेऊन त्या व्यक्तीची धिंड काढणे चुकीचे होते.त्यानी तक्रार दिल्याने त्या महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. तर महिलांच्या तक्रारीवरून त्या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. 

सहायक पोलिस निरीक्षक,गोरक्षनाथ नागलोक,धाबा 👇

कायदा हा सर्वांसाठी समान आहे. महिलांनी त्याच्या घरात शिरून त्याला ओढत चौकात आणले, अशी तक्रार त्या व्यक्तीने केली आहे. त्यावरून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. तर महिलांनी केलेल्या तक्रारीवरून त्या दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले. तपास सुरू आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र संपता- संपेना,असे चित्र निर्माण झाले आहे.जंगल परिसरात गेलेल्यांना वाघोबा तर सोडतच नाही.अश्यातच वाघ आता चक्क शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही...

पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  अमरावती :-एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज,बुधवार २१ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास अमरावती शहरात उघडकीस...

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; आता खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत.. -जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून निवडणूक साहित्य वाटप व्यवस्था व स्ट्राँग रूमची पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या दोन तासांऐवजी आता चार...

शाळांना ‘या’ तारखेपासून लागणार दिवाळीच्या सुट्ट्या..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!