Friday, October 16, 2026
Homeचंद्रपूरभरती प्रक्रिया शुल्क कमी करुन परिक्षार्थ्यांना दिलासा द्या..!-आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे...

भरती प्रक्रिया शुल्क कमी करुन परिक्षार्थ्यांना दिलासा द्या..!-आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोरपना ता.प्र./नितेश केराम 

कोरपना(चंद्रपूर) :- राज्य शासनाकडून वन विभागातील वनरक्षक,स्टेनो,लेखापाल,महसूल विभागातील तलाठी,गृह विभागातील राज्य उत्पादन शुल्क खात्यांतर्गत जवान पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.सदर भरती प्रक्रियेबद्दल स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या बेरोजगार युवक युवतींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.मात्र परिक्षार्थी भरती प्रक्रिया शुल्कापोटी आर्थिक विवंचनेत असल्याचे दिसून येत आहे.

तिन्ही भरती प्रक्रिया टी.सी.एस.या खासगी कंपनी मार्फत राबविण्यात येत असून ऑनलाईन पध्दतीने ही परिक्षा घेण्यात येणार आहे.यासाठी अ.मागास प्रवर्गासाठी १००० रुपये आणि मागासवर्गीय,आर्थिक दुर्बल घटक व इतर प्रवर्गासाठी रुपये ९००/- एवढे परिक्षा शुल्क ठेवण्यात आले आहे.सदरची परिक्षा शुल्क रक्कम अवाढव्य असून विद्यार्थ्यांना एवढे शुल्क भरणे कठीण आहे.आधीच बेरोजगार त्यातही हालाखीच्या परिस्थितीत अहोरात्र अभ्यास करुन विद्यार्थी परिक्षेला सामोरे जात आहे.मात्र भरमसाठ ठेवलेल्या शुल्कामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.असे असतांना राज्य शासनानी सदरहु शुल्क कमी करण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे.तरी राज्य शासनानी होऊ घातलेल्या नोकर भरती प्रक्रिया शुल्क कमी करण्यासाठी तातडीने निर्णय घेवून राज्यातील बेरोजगार व होतकरू विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा; अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!