Friday, October 16, 2026
Homeगोंदियान्यायालय परिसरात खर्रा खाऊन 'पीचिक नं' थुंकी मारणे चौघांना पडले भारी...- मुख्य...

न्यायालय परिसरात खर्रा खाऊन ‘पीचिक नं’ थुंकी मारणे चौघांना पडले भारी…- मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी प्रत्येकी १२०० रुपये ठोठावली दंडाची शिक्षा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गोंदिया :- सध्याच्या घडीला खर्रा,गुटखा व तंबाखू खाऊन सार्वजनिक ठिकाणी व इतर ठिकाणी थुंकी मारणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. बऱ्याच ठिकाणी अशा कृत्त्यांवर निषेध म्हणून छोटे-मोठे फलक लावण्यात येत असले; तरीही त्याचे कुणाला ‘ना सुतक ना बारसा’असे दिसून येते.असाच प्रकार हल्ली निदर्शनास आला व चौघांना महागात पडला आहे.चौघेही गोंदिया जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील वास्तव्यास राहणारे असून न्यायालय परिसरात तंबाखू-गुटखा खाऊन ‘पीचिक नं’ थुंकी मारल्याने चौघांनाही प्रत्येकी १२०० रुपये प्रमाणे मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सार्वजनिक ठिकाणी,शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये व इतर ठिकाणी खर्रा,गुटखा तंबाखू,बिडी,सिगारेट ओढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अनेकांकडून ऐरणीवर टांगला जातो आहे.तुम्ही कितीही फलक लावले तरीही अनेकांना काहीही फरक पडणार नाही.असाच प्रकार न्यायालय परिसरात घडला आहे.पठ्ठ्यांनी चक्क न्यायालय परिसरातच पिचकाऱ्या मारणे सुरू केल्याने; सदर बाब निदर्शनास येताच दंड ठोठावण्यात आला आहे.तीन दिवसांपूर्वी रमेश आत्माराम गणवीर राहणार मरारटोली,राकेश मुनेश्र्वर माहुले रा.पांजरा,ओमकार झामसिंग नागपुरे रा.इर्री व विकास नरेंद्र चव्हाण रा.गड्डाटोली या चौघांनी न्यायालय परिसरात तंबाखू- खर्रा खाऊन ‘पीचिक-पीचिक’ मुखातून पिचकाऱ्या मारल्याने प्रत्येकी १२०० रुपये प्रमाणे न्याय दंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी चौघांनाही दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!