Wednesday, June 24, 2026
Homeचंद्रपूरसोनुर्ली गावातील अवैध दारू विक्री बंद करा- गावातील नागरिकांची मागणी

सोनुर्ली गावातील अवैध दारू विक्री बंद करा- गावातील नागरिकांची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोरपना ता.प्र./नितेश केराम

कोरपना(चंद्रपूर):- कोरपनातालुक्यातील सोनुर्ली गावामधे अनेक दिसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध  दारूचा महापूर सुरू असल्याने याकडे पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष,पदाधिकारी,सदस्य व गावातील महिला वर्ग यांनी पुढाकार घेऊन कोरपना पोलीस ठाण्यात धडक देताच अवैधरीत्या चालणारी दारू विक्री बंद करण्यात आली होती.मात्र हल्ली सोनुर्ली गावामध्ये अवैध दारू विक्री खुलेआम व अती जोमाने सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या नाकी नऊ आले आहे. अशातच अनेकजण दारूच्या आहारी जाऊन अनेकांची संसारे उध्वस्त होतांना दिसून येत आहेत.मात्र याचे कुणाला ‘ना सुतक ना बारसा’ असे दिसून येत असल्याने गावातील महिला वर्ग,पुरुष वर्ग, प्रतिष्ठित नागरिक व इतर मान्यवरांनी एकत्र येऊन अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी; अशी मागणी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!