उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- राज्य योजने अंतर्गत १ जुलै २०१९ पासून सुरू करण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीतील करोडो रुपयांचा घोटाळा देसाईगंज तालुक्यातील एका संबंधित विभागात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.करोडो रुपयांचा घोटाळा करणारे संबंधित विभागातील
तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यामध्ये असून वरच्या स्तरापासून तर खालच्या स्तरापर्यंत सर्वांचे खिसे गरम करण्यात आले आहेत.एवढ्या मोठ्या सुजाण,सामाजिक,राजकीय व खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांच्या नजरे देखत डोळ्यात धूळफेक करून लूटमार करण्यात आली आहे; तर मग ज्या ठिकाणी केवळ काहींच्याच इशाऱ्यांवर नाचणारी मंडळी असणाऱ्या भागात किती मोठा घोटाळा असेल; याचा काही नेम नाही.देसाईगंज तालुक्यातील एवढा मोठा घोटाळा येत्या सात दिवसांत उघड होणार असून यातील वरच्या स्तरापासून तर खालच्या स्तरातील तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची रीतसर तक्रार राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,विरोधी पक्ष नेते व इतर ठिकाणी करून सर्वांचे पितळ उघडे पाडण्यात येणार आहे.
३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजनेमध्ये विविध प्रजातींची रोपे खरेदी,रोपे वाहतूक,वृक्ष लागवड,बोगस मजुर,कामावर न गेलेल्यांच्या खात्यावर रक्कम टाकणे व इतर अशी अनेक बोगस कामे एका संबंधित विभागात करण्यात आली आहेत.अशातच विविध प्रजातींच्या रोपांची खरेदी तर करण्यात आली; मात्र प्रत्यक्ष साईटवर मोजकीच वृक्ष दिसून येत आहेत. तसेच जिवंत रोपांची टक्केवारी कमी असतांना जिवंत रोपांची टक्केवारी जास्त दाखवून,वरिष्ठ कार्यालयास पत्रव्यवहार करून रकमेची मागणी करणे.सर्व प्रकार नजरेसमोर असूनही माहीत नसल्याचे करून मिशिवर ताव मारणे म्हणजे “ना आव.. ना ताव.. देवा मले पाव..” अशी अवस्था निर्माण झाली आहे.मुख्यत्वे
शासकीय पदावर विराजमान होऊन जेमतेम काही वर्ष होतात व असेच जास्तीचे उतावळेपणा करतांना दिसून येतात.हाच उतावळेपणा एक दिवस महागात पडणार आहे.त्यामुळे “कातावली गाय अन् काटे खाय” होऊन सर्व काही गमावून बसल्याशिवाय राहणार नाही.याबाबत येत्या सात दिवसांत भांडाफोड होऊन वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येणार असल्याने ‘जरा सांभाळून पुढची घंटा धोक्याची’असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

