Tuesday, September 8, 2026
Homeचंद्रपूरशासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रक्कम घेतांना दिसून येतात.अश्यांना धडा शिकवणे गरजेचे मानून एका सुजाण नागरिकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा((एसीबी)आधार घेतला आणि केंद्र चालकाला चांगलाच धडा शिकवला.विशेष म्हणजे,शासकीय शुल्क होते ६९ रुपये,तर ८१ रुपये होते वरची कमाई.केवळ दीडशे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सेतू केंद्र चालकास रंगेहाथ पकडले.सचिन रामचंद्र खैरे वय ४० वर्षे,रा.गडचांदूर,ता.कोरपना, जि.चंद्रपूर असे लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सेतू केंद्र चालकाचे नाव आहे.
प्रकरणातील तक्रारदारास उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता असल्याने गडचांदूर येथील ‘त्रिशा ऑनलाइन सर्व्हिसेस’ नामक सेतू केंद्रातून कागदपत्रे ऑनलाईन केली.ज्यावेळेस तक्रारदाराला दाखला घेणे होता,त्यावेळी केंद्र चालकाने दोनशे रुपयांची मागणी केली.प्रकरणी तक्रारदाराने चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.त्यानुसार, काल सोमवार ७ सप्टेंबर रोजी तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करून सापळा रचण्यात आला.सापळा कारवाई दरम्यान तक्रारदाराकडून ६९ रुपये शासकीय शुल्क व ८१ रुपये लाचेची रक्कम,असे एकूण १५० रुपये स्वीकारतांना सेतू केंद्र चालक सचिन खैरे यांना रंगेहात पकडण्यात आले.सदरची कारवाई ही  सायंकाळच्या सुमारास करून या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गडचांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!