- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने धूमधडाका सुरू ठेवल्याने सततच्या पावसामुळे प्रमुख जलाशयांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. अश्यातच संततधार पावसामुळे पाण्याची आवक वाढल्याने गोसेखुर्द धरण प्रकल्पाचे १५ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून नदीपात्रात १८३१.९६ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.यामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गोसेखुर्दचा जलसाठा ५८.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे.सध्या जिल्ह्यासाठी पावसाचा ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर येत्या सोमवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.काही दिवसांपासून कोसळलेल्या समाधानकारक पावसामुळे भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर इतरही जिल्ह्यातील शेतीकामांना वेग आला असून धान रोवणीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.पाऊस कायम राहिल्यास खरीप हंगामात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

