Tuesday, September 8, 2026
Homeनागपूर९० किलो प्रतिबंधित तंबाखूसह ७ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त..

९० किलो प्रतिबंधित तंबाखूसह ७ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका चारचाकी वाहनाने मध्य प्रदेशच्या पांढुर्णा येथून सावनेर मार्गे नागपूरच्या दिशेने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या सावनेर तालुक्याच्या केळवद पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सदरची कारवाई पांढुर्णा-सावनेर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बिहाडा फाटा परिसरात केली.कारचालक सूरज मनोहर पाटील वय ३१ वर्षे,दाढेरा, ता.कळमेश्वर, जि.नागपूर व रोशन प्रदीप तलमले वय ३१ वर्षे, रा.रामनगर,वर्धा अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केळवद पोलिसांनी पांढुर्णा-सावनेर दरम्यानच्या बिहाडा फाटा परिसरात नाकेबंदी करून वाहनांची तपासणी केली असता एमएच ४० सीएक्स ७३८२ क्रमांकाच्या कारमध्ये मागच्या भागात ठेवलेल्या पोत्यात तंबाखूची पाकिटे व डबे आढळून आले.प्रकरणी पोलिसांनी ७ लाख रुपयांची कार आणि १८ हजार रुपये किंमतीचा तब्बल ९० किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखू असा एकूण ७ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी केळवद पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता(बीएनएस) कलम १२३,अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम कलम २७४,२७५,२२३ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.सदरची कारवाई केळवद पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!