Tuesday, September 8, 2026
Homeनागपूरबसने धडक देत वाहनासह फरफटत नेले; गंभीर जखमी शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू..

बसने धडक देत वाहनासह फरफटत नेले; गंभीर जखमी शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दुचाकीने शाळेत जाण्यासाठी निघालेल्या  शिक्षकाला वाटेतच विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसने धडक देत वाहनासह फरफटत नेले.यात गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कामठी-इतवारी नागपूर मार्गावर घडली.नीलेश मुर्लीधर पारधी वय ४१ वर्षे,रा.रामकृष्ण लेआउट,येरखेडा,ता.कामठी,जि.नागपूर असे मृत शिक्षकाचे नाव असून,ते नागपूर शहरातील सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकपदी कार्यरत होते.
नीलेश पारधी हे सकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या एमएच-४० झेड-२९२२ क्रमांकाच्या दुचाकीने
स्वगावाहून नागपूर शहराच्या सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळेत कर्तव्यावर जात होते.दरम्यान, कळमना परिसरात विरुद्ध दिशेने म्हणजेच नागपूरहून कामठीच्या दिशेने वेगात जाणाऱ्या एमएच ३१ एफसी-०९७१ क्रमांकाच्या नागपूर महानगरपालिकेच्या आपली बसने धडक देत त्यांना दुचाकीसह फरफटत नेले.यात गंभीर दुखापत झाल्याने नीलेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर घटना घडताच चालकाने बस घटनास्थळीच सोडून पळ काढला.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठविला.याप्रकरणी कळमना(नागपूर) पोलिसांनी बसचालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (बीएनएस)कलम २८१,१०६ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!