Tuesday, August 18, 2026
Homeचंद्रपूरवाघ आढळला मृतावस्थेत; परिसरात खळबळ..

वाघ आढळला मृतावस्थेत; परिसरात खळबळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली वनपरिक्षेत्रातील चितेगाव बिट आणि राजोली राऊंड अंतर्गत येणाऱ्या मूल तालुक्यातील चिखली चक क्र.२ येथील बिगर वनक्षेत्रात सर्व्हे क्रमांक ७८ मध्ये आज,मंगळवार ३० जून रोजी दुपारच्या सुमारास एक नर वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.मृत वाघाचे वय अंदाजे ६ ते ७ वर्षे असून प्राथमिक अंदाजानुसार, वाघाचा मृत्यू एक दिवसापूर्वी  झाला असावा,अशी शक्यता वर्तविण्यात आली.घटनेची माहिती मिळताच एसीएफ विकास तरसे, सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, वाइल्डलाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाचे  प्रतिनिधी मुकेश भांदककर,इको-प्रोचे प्रतिनिधी राजू काहीलकर यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले.यावेळी नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन अथॉरिटी प्रतिनिधींच्या उपस्थितीत मृतदेहाची सविस्तर पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाघाचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याचे आढळून आले.दरम्यान,वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून,त्यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी.. – देसाईगंज-आरमोरी मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज-आरमोरी मार्गावर जणूकाही अपघातांच्या मालिकांचे सत्र सुरू झाले की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.नुकताच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी देसाईगंज-आरमोरी मार्गावरील कुरुड...

अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलाची केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-भंडारा शहरातून आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून...

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५...

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!