Sunday, August 30, 2026
Homeचंद्रपूरचक्क बारमध्येच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड..

चक्क बारमध्येच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी शहरातील फाशी चौक परिसरात चालवल्या जाणाऱ्या एका देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एका पिडीत महिलेची सुटका केली,तर देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या पती-पत्नीला अटक केल्याची घटना ताजी असतांनाच आता चिमूर शहराच्या आझाद वॉर्ड परिसरातील चक्क बारमध्येच सुरू असलेल्या एका देहव्यापाराचा चिमूर पोलिसांनी भांडाफोड करून वनिता बारची मालक वनिता जगन रंगारी हिला ताब्यात घेण्यात आले आहे.त्याचबरोबर, देहव्यापारासाठी वापरल्या जाणारे साहित्य व रोख रक्कमही जप्त करण्यात आली.सदरची कारवाई काल १६ मे रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर शहरातील आझाद वॉर्ड परिसरात असलेल्या वनिता बारच्या वरच्या मजल्यावर निवासगृहासारख्या खोल्या तयार करून बाहेरील महिलांना ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले जात होते. तसेच महिलांकडून मिळणाऱ्या पैशातून कमिशन घेऊन त्यांचे आर्थिक शोषण केले जात असल्याची माहिती समोर आली.पोलिसांनी या माहितीच्या आधारे खात्री केली.त्यानंतर,चिमूर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. आरोपी महिलेने १ हजार रुपयांत महिला व खोली उपलब्ध करून दिल्यानंतर बनावट ग्राहकाने पोलिसांना सांकेतिक इशारा दिला.त्यानंतर पोलिसांच्या पथकाने गावातील दोन प्रतिष्ठित महिला पंचांसह मद्य बारवर धाड टाकली.यादरम्यान,वरच्या मजल्यावरील खोली क्रमांक तीनमध्ये बनावट ग्राहक व पीडित महिला आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. घटनास्थळावरून देहव्यापारासाठी वापरले जाणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले.तसेच आरोपीच्या ताब्यातून १८ हजार २०० रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. पीडित महिला मागील सहा महिन्यांपासून बार संचालिकेकडे राहत होती.याप्रकरणी चिमूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!