Sunday, August 30, 2026
Homeचंद्रपूरव्हॉट्सॲपवर आरटीओ चालान; क्लिक करताच मोबाईल हॅक.. - १ लाख ९४ हजार...

व्हॉट्सॲपवर आरटीओ चालान; क्लिक करताच मोबाईल हॅक.. – १ लाख ९४ हजार लंपास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-नागरिकांना आरटीओ ई-चालान बाबत नेहमी सतर्कता बाळगा म्हणून आवाहन करण्यात येत असते, मात्र काहीजणांना याबाबत अजूनही कल्पना नसल्याने मोठा आर्थिक फटका बसतांना दिसून येतो.अश्याच प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती शहरात नुकताच ‘आरटीओ ई-चालान’ चा ३४ वर्षीय तरुण बळी पडल्याची घटना उघडकीस आली आहे.व्हॉट्सॲपवर आलेल्या आरटीओ ई-चालानच्या एपिके फाईलवर क्लिक करताच क्षणातच मोबाईल हॅक झाला आणि मोबाईलचा संपूर्ण ताबा ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या चोरट्याकडे जाऊन बँकेच्या खात्यातील तब्बल १ लाख ९४ हजार ७०० रुपये लंपास झाल्याची घटना काल शुक्रवारी उघडकीस आली.इम्रान खान वय ३४ वर्षे, रा.इंदिरानगर,भद्रावती,जि.चंद्रपूर यांच्या बाबतीत सदरचा प्रकार घडलेला असून त्यांनी चंद्रपूरच्या सायबर सेलकडे अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
भद्रावती येथील इम्रान खान यांना बुधवारी त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर ‘आरटीओ ई-चालान’ नामक ‘एपिके’ फाईलचा मॅसेज आला.त्यांना वाटले की आपल्यावर कुठले तरी चालान आले असावे, त्यामुळे खान यांनी त्या फाईलवर क्लिक केले.फाईलवर क्लिक करताच क्षणातच मोबाईल हॅक झाला आणि मोबाईलचा संपूर्ण ताबा हा चोरट्याकडे हस्तांतरित झाला.लागलीच सायबर चोरट्यांनी त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून पहिल्यांदा १ लाख ९० हजार रुपये व नंतर ४ हजार ७०० रुपये,अशी एकूण १ लाख ९४ हजार ७०० रुपयांची रक्कम काढून बँक ऑफ बडोदाच्या खात्यात वर्ग केली.मोबाईलवर रक्कम काढल्याचे मॅसेज दिसताच खान यांच्या लक्षात आले.या प्रकरणी त्यांनी सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!