- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-तब्बल २१ गोवंशांची अवैधरीत्या तस्करी करणाऱ्या तिघांपैकी दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मोठे यश आले आहे.या कारवाईत पथकाने सुमारे २४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये दोन पिकअप वाहने ज्याची किंमत सुमारे २० लाख रुपये,३ लाख ८० हजाराचे २१ गोवंश व तीन मोबाईल संच ज्याची किंमत ४९ हजार रुपये.प्रकरणी चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०,महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५)तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस)अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.संतोष रामभाऊ थोरात वय ५२ वर्षे, ऐजाज असलम बेग वय ३८ वर्षे व वसीम नबी कुरेशी वय ३८ वर्षे, रा.बगळखिडकी वार्ड,चंद्रपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले व पथकास पडोली मार्गे तेलंगणाकडे पिकअप वाहनातून कत्तलीसाठी अवैधरीत्या गोवंशांची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार,पथकाने पहाटेच्या सुमारास रामाळा तलाव परिसरातील रेल्वे फाटक नजिक संशयित वाहनांवर पाळत ठेवली.संशयित वाहन येताच दोन पिकअप वाहनांची तपासणी केली असता तपासणीदरम्यान १४ गायी व ७ बैल अशा एकूण २१ गोवंशांना अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून नेले जात असल्याचे आढळून आले.तपासात सदरचे गोवंश गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची येथून चंद्रपूर मार्गे तेलंगणाच्या यद्रपूर येथे कत्तलीसाठी नेले जात असल्याचे निष्पन्न झाल्याने कोरचीतून निघाले अन् चंद्रपुरात अडकल्याची चर्चा रंगू लागली आहे.सर्व गोवंशांना ‘प्यार फाऊंडेशन’ चंद्रपूर येथे वैद्यकीय तपासणीसाठी हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सदरची कारवाई चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुग्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पीएसआय विनोद भुरले,सुनिल गौरकार,पोलीस हवालदार दिपक डोंगरे, इम्रान खान,हिरालाल गुप्ता,किशोर वाकाटे,शशांक बदामवार यांचेसह चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
- Advertisement -

