Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूर'त्या' नरभक्षक वाघाला वनविभागाने केले जेरबंद..

‘त्या’ नरभक्षक वाघाला वनविभागाने केले जेरबंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभिड तालुक्यातील मिंथुर गाव नजीकच्या शेतशिवारात मोहफुले वेचण्यासाठी गेलेला शेतमजूर वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना नुकतीच रविवार ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती.मिंथुर गावातील
रहिवासी शेतकरी हरिदास महादेव कुबडे वय ५८ वर्षे हे शेतपरिसरात मोहफुले वेचत असतांनाच वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवून ठार केले होते.त्यातच,परिसरात मागील काही दिवसांपासून वाघांच्या हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या पार्श्वभूमीवर वनविभागाने कारवाई करत एका नर वाघाला जेरबंद केले आहे.
नागभीड तालुक्यातील मिंथुर,बाळापुर आणि  आसपासच्या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाच वाघांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ल्याच्या घटनाही समोर येत असल्याने वनविभाग सतर्क झाला होता.या पार्श्वभूमीवर तळोधी जवळील सावर्ला परिसरात वनविभागाच्या पथकाने सापळा रचत एका नर वाघाला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.वाघाला सुरक्षितरित्या पकडल्यानंतर त्याला नागभीड येथील वनविभागाच्या कार्यालयात नेण्यात आले.यानंतर पुढील प्रक्रियेसाठी वाघाला पिंजऱ्यासह नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरकडे रवाना करण्यात आले.विशेष म्हणजे,परिसरात अजूनही चार वाघांचा वावर असल्याची माहिती असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.वाघांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी वन विभाग सज्ज झाला असून नागरिकांनी जंगल परिसरात जाऊ नये,असेही आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!