Saturday, August 29, 2026
Homeभंडाराआज परश्याची अर्ची भंडारा शहरात..

आज परश्याची अर्ची भंडारा शहरात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या दमदार
अभिनयाने प्रसिद्ध “सैराट” फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचे आज,शनिवार ३१ जानेवारी रोजी भंडारा शहरात आगमन होणार आहे.विशेष म्हणजे, उद्या,रविवार १ फेब्रुवारी भंडारा जिल्ह्याच्या  बेला ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विशेष प्रचार आणि प्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोहिमेला बळ देण्यासाठी मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू उपस्थित राहणार आहेत.त्यांच्या या भेटीमुळे ग्रामपंचायत स्तरावरील विकास कामांना आणि लोकचळवळीला नवा उत्साह मिळण्याची शक्यता आहे.नियोजित कार्यक्रमानुसार रिंकू आणि राज्यस्तरीय चमुचे आज भंडारा शहरात आगमन होईल.त्या रात्री तिथेच मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी उद्या रविवारी सकाळी ९.४० वाजता बेला ग्रामपंचायतला भेट देतील.यावेळी त्या राज्यस्तरीय पथकासोबत अभियानाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन नागरिकांशी संवाद साधतील.जिल्हा परिषद प्रशासनाने या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असून जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाला उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे तब्बल १० सराईत गुन्हेगार तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर येत  नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या...

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!