- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.मुलीशी प्रेमविवाह करणाऱ्या २५ वर्षीय जावयाच्या खुनाची सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याची घटना मोहाडी तालुक्याच्या बेटाळा गावात उघडकीस आली.सर्वत्र भारतीय प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सुरू असतांनाच सदरची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली.प्रकरणी मोहाडी पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून आज, मंगळवारी पाच जणांना अटक केली आहे.आकाश शेंडे वय २५ वर्षे,रा.बेटाळा,ता.मोहाडी,जि.भंडारा असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर मृतकाची सासू अंजू रमेश कुंभलकर वय ४३ वर्षे,साळा चेतन रमेश कुंभलकर वय २३ वर्षे यांच्यासह हत्येतील सहभाग असलेले भारत मोहतुरे वय २६ वर्षे,महेंद्र बोरकर वय ३१ वर्षे,दिनेश उर्फ सचिन मोहन ईश्वरकर वय ३७ वर्षे असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की,आकाश शेंडे याने अवघ्या दोन महिन्यांपूर्वी गावातीलच सासू अंजू कुंभलकरच्या मुलीशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता.मुलीनेही घरच्यांच्या विरोधाला झुगारून आकाश सोबत राहण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार,नवदांपत्य बेटाळा गावातच वास्तव्यास होते.मात्र,सदरची बाब ही मुलीच्या आईच्या मनात खटकू लागली आणि जावयाच्या खुनाचा कट रचून आकाश शेंडेची हत्या करण्यात आली.हत्येनंतर तरुणाचा मृतदेह गावालगत असलेल्या नाल्यात फेकून ती आत्महत्या असल्याचा बनाव करण्यात आला.मात्र,मोहाडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तपासाची चक्रे वेगाने फिरवत जावयाची आत्महत्या नसून सासूने खुनाची सुपारी देत हत्या केल्याचा कट उघडकीस आला आहे.प्रकरणी मोहाडी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
- Advertisement -

