- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील नांदगाव येथे आज,बुधवार २१ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडून अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला,तर १२ जणांना किरकोळ दुखापत होऊन एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.अपघातात हरिदास मिटपल्लीवार वय ३५ वर्षे,रा.नांदगाव,ता.मूल,जि.चंद्रपूर व वनिता भिकारू मरसकोल्हे वय ४० वर्षे,रा.डोंगर(हळदी)यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
माहितीनुसार,तेलंगणा राज्यातून रोवणी करून परत येत असतांना मजुरांनी भरलेल्या पिकअप वाहनाने मूल तालुक्याच्या नांदगाव येथील लक्की बार जवळ आज सकाळी साडे सहाच्या सुमारास शौचासाठी बाहेर पडलेल्या हरिदास मिटपल्लीवार यांना रस्ता ओलांडत असतांना जोरदार धडक दिली.यात हरिदास यांचा जागीच मृत्यू झाला.अश्यातच हरिदास यांना धडक दिल्याने पिकअप वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले.यात पिकअप वाहनातील वनिता मरसकोल्हे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर १३ मजूर जखमी झाले. यातील एक महिला मजूर गंभीर जखमी झाली.घटनेची माहिती मूल पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत जखमींना मूल उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.तर यातील गंभीर जखमी महिलेस चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर ठिकाणाहून परत येतांना गोर-गरिबांवर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनेचा पुढील तपास मूल पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

