Sunday, August 9, 2026
Homeधानोराथ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन वनरक्षकाचा मृत्यू..

थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन वनरक्षकाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन एका ३० वर्षीय वनरक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार २१ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील मुरमाडी गावातील शेत शिवारात घडली. सचिन देवराम हलामी वय ३० वर्षे,रा.ईरुपटोला, ता.धानोरा,जि.गडचिरोली असे मृत पावलेल्या वनरक्षकाचे नाव असून त्यास काही कलावधीपूर्वी अवैध लाकूड तस्करी प्रकरणी निलंबित करण्यात आले होते.
सध्या स्थितीत गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात धान मळणीची कामे सुरू आहेत.विशेष करून,धानोरा तालुका परिसरातील काही शेतकरी जो पर्यंत धान विक्रीसाठी महामंडळात नंबर लागत नाही,तोपर्यंत धानाची मळणी करीत नसल्याची माहिती आहे.त्यानुसार,
आज बुधवारी मुरमाडी येथील शेतकरी विकास शेंडे यांच्या शेतात धान मळणी सुरू होती.मळणी सुरू असतांना सचिन हलामी हा थ्रेशर मशिन जवळ असल्याने त्याचा अचानकपणे मशीनमध्ये तोल गेला.यात शरीराचा बराचसा भाग मशीनमध्ये अडकून पडल्याने श्वास कोंबला गेला आणि काही क्षणातच सचिनचा मृत्यू झाला.मृतक सचिनच्या पश्चात पत्नी व मुलगी असून घटनेने कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.प्रकरणी कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा उपपोलिस ठाण्यात  मर्ग दाखल करण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!