Tuesday, September 1, 2026
Homeचंद्रपूरअखेर प्रशासनास आली जाग; किडनी विक्री प्रकरणातील पिडीत शेतकऱ्याची घेतली भेट..

अखेर प्रशासनास आली जाग; किडनी विक्री प्रकरणातील पिडीत शेतकऱ्याची घेतली भेट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील रोशन शिवदास कुळे वय ३५ वर्षे,या तरुण शेतकऱ्याची व्यथा मंगळवार १६ डिसेंबर २०२५ रोजी सर्वत्र उघड झाली आणि संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली.प्रकरणाची सर्वप्रथम दखल प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी घेतली होती.त्यानुसार,३ जानेवारी २०२६ रोजी हजारो शेतकऱ्यांसह मिंथूर ते नागभीड तहसील कार्यालयापर्यंत १० किलोमिटर लाँग मार्च काढून एकही लोकप्रतिनिधी वा लोकसेवकाने शेतकऱ्याची साधी भेटही घेतली नाही म्हणून संताप व्यक्त केला होता.शेतकऱ्याला किडनी विकावी लागल्याचा आणि सावकारी जाचाचा प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तातडीने चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अशोक उईके यांच्याशी सविस्तर चर्चा केली.तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना या प्रकरणाची गंभीर व सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले.यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी(विशेष तपास पथक)स्थापन करण्यात आले आहे.अश्यातच आज,शुक्रवार ९ जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अशोक उईके,आमदार कीर्तीकुमार भांगडिया,जिल्हाधिकारी डॉ.विनय गौडा,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,जिल्हा उपनिबंधक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यांनी मिंथूर गावात जाऊन रोशन कुळे व त्यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि आस्थेने विचारपूस केली.या प्रकरणातील सावकारांनी रोशन कुळे यांच्याकडून कर्ज परतफेडीच्या नावाखाली घेतलेली मालमत्ता आणि रक्कम परत मिळवून देण्यासाठी शासनाकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. बळजबरीने विक्री/बळकावलेली शेती रोशन कुळे यांच्या नावावर परत मिळवून देण्याचे काम सुरू असून गहाण ठेवलेले सोने परत मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.सावकारांचे बँक खाते फ्रीझ/स्विच करण्यात आले असून त्यात १६ लाख रुपये जमा आहेत, ती रक्कम कायदेशीररित्या रोशन यांना परत देण्याचे प्रयत्न सुरू असून कर्जफेडीसाठी घेतलेले ट्रॅक्टर कोर्टाच्या माध्यमातून कायदेशीररित्या परत मिळवून देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती आमदार भांगडिया यांनी यावेळी दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!