Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीराष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत मिळणार अर्थसहाय्य.. -इच्छुक वैयक्तिक शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपन्या व...

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत मिळणार अर्थसहाय्य.. -इच्छुक वैयक्तिक शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपन्या व संस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खाद्य तेल अभियान-तेलबिया अंतर्गत सन २०२५-२६ साठी राबविण्यात येणाऱ्या काढणी पश्चात पायाभूत सुविधा सहाय्य या महत्त्वपूर्ण घटकाचा लाभ आता केवळ शासकीय व खाजगी उद्योग,शेतकरी उत्पादक संस्था (FPOs)आणि सहकारी संस्थांपुरता मर्यादित न राहता वैयक्तिक शेतकऱ्यांनाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या केंद्र शासनाच्या आढावा बैठकीत सविस्तर चर्चा करून,सदर घटकांतर्गत इतर पात्र वैयक्तिक शेतकऱ्यांनाही अर्थसहाय्य देता येईल,असे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार,अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निश्चित केलेल्या भौतिक व आर्थिक लक्षांकांच्या मर्यादेत राहून आता शासकीय/खाजगी उद्योग,शेतकरी उत्पादक संस्था,सहकारी संस्था यांच्यासह वैयक्तिक लाभार्थ्यांनाही सहाय्य दिले जाणार आहे.
तेलबिया प्रक्रियेला चालना देण्याचा उद्देश👇
गडचिरोली जिल्ह्यात तेलबियांच्या संकलन,तेल निष्कर्षण व पुनर्प्राप्ती प्रक्रियेत कार्यक्षमतेत वाढ व्हावी,तसेच स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन घडून यावे, या उद्देशाने काढणी पश्चात पायाभूत सुविधा उभारणीसाठी शासनामार्फत सहाय्य दिले जाणार आहे.यामध्ये विशेषतः तेलघानी,तेल निष्कर्षण युनिट्स व तेलबिया प्रक्रिया संबंधित यंत्रसामग्रीचा समावेश आहे.
अर्ज प्रक्रिया व निवड पद्धत👇
या घटकांतर्गत अर्ज स्वीकारतांना प्रथम अर्जास प्रथम प्राधान्य या तत्त्वाचा अवलंब केला जाणार आहे. तेलबिया व मोहरी संचालनालयामार्फत प्राप्त प्रस्तावांचे परीक्षण करण्यात येईल.निवड झालेल्या प्रकल्पांना राज्य कृती आराखड्यांमार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.मात्र, जमीन व इमारत खर्चासाठी कोणतेही सहाय्य दिले जाणार नाही आणि हे खर्च प्रकल्प खर्चात ग्राह्य धरले जाणार नाहीत.
तेलघानी निष्कर्षण युनिटसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री व उपकरणे तसेच तेलबिया प्रक्रिया प्रकल्पासाठी
प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल रुपये ९.९० लाख प्रति प्रकल्प इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पात्र व इच्छुक वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या व संस्था यांनी या घटकाचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे पूर्णतः पालन करून या योजनेचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यात येत असून,जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!