Monday, August 31, 2026
Homeभंडाराजखमी अवस्थेत आढळला वाघ; अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिल्याची शक्यता..

जखमी अवस्थेत आढळला वाघ; अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिल्याची शक्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील धानोरी गावानजिकच्या गोसेखुर्द धरणाच्या(इंदिरा सागर प्रकल्प) मुख्य उजव्या कालव्याच्या मार्गावर आज,मंगळवार ९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास एक वाघ जखमी अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.प्रकरणी परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती तात्काळ वन विभागास दिली.माहिती मिळताच वनाधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वाघ जखमी असल्याने हालचाल करू शकत नव्हता आणि कालव्यात निपचित पडला होता.धानोरी कालव्यातून जखमी झालेल्या वाघाची सुटका करण्यात आली आणि पुढील उपचारांसाठी नागपूरच्या गोरेवाडा बचाव केंद्रात हलवण्यात आले.रात्रीच्या सुमारास अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांनी वाघाला धडक मारली असावी,असा कयास बांधला जातो आहे.यावेळी उपवनसंरक्षक डॉ.योगेंद्र सिंग,सहाय्यक वनसंरक्षक सचिन निळख,सहाय्यक वनसंरक्षक संजय मंढे, सहाय्यक वनसंरक्षक रितेश भोंगाडे,वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश महाजन,वनपरिक्षेत्र अधिकारी रूषाली नागदेवे,वनपरिक्षेत्र अधिकारी विलास बेलखोडे व वन कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!