Friday, August 28, 2026
Homeभंडाराउसने-उधार घेतलेल्या रकमेच्या परतफेडीचा चेक बाऊन्स.. - मित्राला एक वर्षाची शिक्षा अन्...

उसने-उधार घेतलेल्या रकमेच्या परतफेडीचा चेक बाऊन्स.. – मित्राला एक वर्षाची शिक्षा अन् रक्कम परत करण्याचे आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-मैत्रीचे संबंध असलेल्या जवळच्या मित्राला काही कालावधीसाठी २ लाख ७५ रुपये उसने-उधार दिले.दिलेली रक्कम परत मागण्यात आली तेव्हा चेक देण्यात आला खरी,पण तो बाऊन्स म्हणजेच खात्यात दिलेल्या चेक एवढी रक्कम नसल्याने वटलाच नाही. यामुळे ‘मैत्री गेली खड्ड्यात’ असे मानून न्यायालयात धाव घेतली.प्रकरणी न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा तसेच धनादेशाची रक्कम १ लाख २५ हजार रुपये आणि प्रकरण दाखल झाल्याच्या तारखेपासून ६ टक्के व्याज दराने परत द्यावे,अशी द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे.घनश्याम दिगांबर मडावी रा.गोलेवाडी, ता.जि.भंडारा असे आरोपीचे नाव असून यांचे पवनी तालुक्याच्या कोरंभी येथील राजेश हरिभाऊ येवले यांच्यासोबत मैत्रीचे संबंध होते.मैत्री असल्याने घनश्याम मडावी यांनी ‘मला सोलर कृषी पंपाचे कंत्राट मिळणार असल्याने काही रकमेची गरज आहे व ती रक्कम लगेच परत करणार’ असल्याचे राजेश यांना सांगितले.त्यानुसार, राजेश यांनी घनश्यामला २ लाख ७५ रुपये उसने-उधार म्हणून दिले होते.काही कालावधीत राजेशने दिलेले रक्कम परत मागितली असता घनश्यामने राजेशला १ लाख २५ हजार रुपयांचा चेक दिला होता.परंतु,दिलेला चेक बाऊन्स झाला.त्यामुळे राजेशने पवनी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात मित्राला अद्दल घडवावी.यासाठी फौजदारी प्रकरण दाखल केले होते.या प्रकरणी न्यायालयाने फिर्यादी पक्षाकडून सादर केलेला कागदोपत्री पुरावा व साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारावर घनश्याम दिगांबर मडावी याला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावत द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!