- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर येथे बालक दिन अत्यंत उत्साहपूर्ण,अनुशासित आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शाळेत आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बाल संरक्षण अधिकारी गडचिरोली प्रियंका आसूडकर,स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक विवेक काहाळे,जिल्हा संघटिका निता आगलावे तसेच स्काऊट मास्टर सेवार्थ चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उमाकांत कव्वासे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांनी स्वीकारले.कब स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण आरोळी देत मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाला प्रेरक सुरुवात केली.त्यानंतर स्काऊटचा ध्वजारोहण सोहळा पार पडताच संपूर्ण परिसरात देशभक्तीचा आणि एकतेचा भाव जागृत झाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी करून बालक दिनाचे महत्त्व सांगतांना त्यांनी “शाळेचा प्रत्येक विद्यार्थी हा राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठीची अमूल्य ठेव आहे” असे सांगत कार्यक्रमाची दिशा निश्चित केली.विद्यार्थ्यांनी बालक दिनावर आधारित प्रभावी भाषण करून आपल्या सर्जनशीलतेची व वक्तृत्वकौशल्याची सुंदर झलक सादर केली.प्रियंका आसूडकर यांनी बालकांचे हक्क, पॉस्को कायदा तसेच गुड टच आणि बॅड टच याबाबत अत्यंत प्रभावी,उपयुक्त आणि संवेदनशील मार्गदर्शन केले.प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये स्वसंरक्षण आणि जागरूकतेचा नवा दीप प्रज्वलित झाला.त्यानंतर निता आगलावे यांनी बुलबुल आणि गाईड चळवळीबद्दल माहिती देत विद्यार्थिनींना येणाऱ्या जिल्हा मेळाव्यास विशेष निमंत्रण दिले.त्यांचे मार्गदर्शन आत्मविश्वास वाढवणारे ठरले.विवेक काहाळे यांनी स्काऊट-गाईडचे वार्षिक उपक्रम,शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वशक्ती यावर सविस्तर माहिती दिली.विद्यार्थ्यांसाठी ही सत्रे प्रेरणादायी ठरली. मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच स्काऊट-गाईड चळवळ विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे,असे सांगत शाळेची प्रगती,नवोन्मेषी उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाचे महत्व अधोरेखित केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शिक्षक ईश्वर गहाणे यांनी केले.तर आभार प्रदर्शन तृषाली सुखदेवे यांनी मांडले, कार्यक्रमाचे उत्साही व शिस्तबद्ध संचालन मंगेश तूपट यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गाईड पथक प्रमुख अपर्णा देवगिरीकर,प्राची खरकटे फ्लॉक लीडर व विजय मुळे सहाय्यक मास्टर इत्यादी शिक्षकांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले.तसेच कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन,शिस्तव्यवस्था,चहा-पाणी यांसह सर्व व्यवस्थांची जबाबदारी प्रियंका तलमले व प्रमिला खरकाटे यांनी अत्यंत काटेकोरपणे पार पाडली.या प्रेरणादायी, ज्ञानसमृद्ध आणि संस्कारमय बालक दिन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा, जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण झाला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मान्यवर,शिक्षकवर्ग,विद्यार्थी व पालक यांचे शाळा परिवारातर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
- Advertisement -

