Friday, September 4, 2026
Homeभंडाराकर भरण्यास दिरंगाई; ग्रामपंचायतीचे चार सदस्य अपात्र..

कर भरण्यास दिरंगाई; ग्रामपंचायतीचे चार सदस्य अपात्र..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-ग्रामपंचायतीच्या मालमत्ता कराचा भरणा विहित मुदतीत न केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४-१ (ह)नुसार चार ग्रामपंचायत सदस्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.प्रकरणी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाचे अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी पवनी तालुक्याच्या अड्याळ ग्रामपंचायतीचे आशिक नैतामे, देविदास नगरे,पुष्पमाला कोहाड,रुबिना सैय्यद या चार ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र घोषित केले आहे.अपात्र ठरलेल्या चारही सदस्यांना मालमत्ता कराचा भरणा करण्याकरीता ग्रामपंचायतीच्या वतीने वारंवार नोटिसा बजावल्या होत्या.मागील वर्षाच्या पहिल्यांदा १३ ऑगस्ट २०२४,नंतर २० सप्टेंबर,११ ऑक्टोबर आणि २८ डिसेंबर २०२४ मध्ये कराचा भरणा करा म्हणून मासिक सभेतही सूचना देण्यात आली होती.परंतु त्यांनी कर भरण्यात तीन महिन्यांच्या मुदतीत कसूर केला.याप्रकरणी विजय सोमाजी डंभारे यांनी ग्रामपंचायत सदस्य अपात्रतेसाठी चार सदस्यांविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती.त्यानुसार,तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १४-१ (ह) चे उल्लंघन केल्याने चारही जणांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!