Friday, September 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तफास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना दिलासा..!

फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना दिलासा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या चारचाकी वाहन तसेच जड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा देत आता फास्टॅग नसेल किंवा तो काम करत नसेल तर दुप्पट भरावा लागणारा टोल कमी करण्यात आला आहे.त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून युपीआय (UPI)म्हणजेच ऑनलाईन पेमेंट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.त्याअंतर्गत टोलची रक्कम भरल्यास केवळ १.२५ पट टोल शुल्क भरावे लागेल.सदरचा नवा नियम हा येत्या,१५ नोव्हेंबर २०२५ पासून लागू करण्यात येणार आहे.पूर्वी फास्टॅग नसलेल्या वाहनांना टोल प्लाझावर दुप्पट टोल भरावा लागत होता.त्यातच फास्टॅग नसेल आणि नगदी रोख रक्कम देणार असाल तर दुप्पट रक्कम भरावी लागेल,पण तीच रक्कम युपीआय द्वारे करत असाल तर केवळ १.२५ पट रक्कम मोजावी लागेल.जसे की,एका सामान्य वाहनाची टोल टॅक्स २०० रुपये असेल तर फास्टॅग नुसार टोलवरती २०० रुपये भरावे लागणार. याच ठिकाणी रोख स्वरूपात टोल भरायचा असल्यास ४०० रुपये(दुप्पट)भरावे लागतील.पण,तीच रक्कम युपीआयच्या(UPI) माध्यमातून केली तर २५० रुपये भरावे लागतील.यामुळे राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या व फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!