Wednesday, August 5, 2026
Homeबीडसमाजमन सुन्न करणारी घटना..! चिमुकल्याची हत्या करून स्वतःही घेतला गळफास..

समाजमन सुन्न करणारी घटना..! चिमुकल्याची हत्या करून स्वतःही घेतला गळफास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात समाजमन सुन्न करणारी घटना आज,शुक्रवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली असून पत्नी झोपेत असतांनाच पतीने अवघ्या चार महिन्याच्या निरागस चिमुकल्यास पाण्याच्या टाकीत टाकून हत्या केली.तर काही वेळाने त्याने घराच्या बाहेरील आड्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ माजली. अमोल हौसराव सोनवणे वय ३० वर्षे रा.तलवाडा, ता.गेवराई,जि.बीड असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.विशेष म्हणजे,चार दिवसांपूर्वी कौटुंबिक वादात अमोल व त्याची पत्नी पायल सोनवणे दोघांनीही विष प्राशन केले होते.काही दिवस उपचार घेऊन काल गुरुवारी तलवाडा गावी परतले होते. अश्यातच दोघांमध्ये रात्रीच भांडण झाले असावे,त्यामुळे आज शुक्रवारी पत्नी झोपेत असतांनाच पहाटेच्या सुमारास अमोल याने चार वर्षीय मुलाला पाण्याच्या टाकीत टाकून हत्या केली व नंतर स्वतःही गळफास घेतला.घटनेची माहीती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर, फौजदार कैलास अन्नलदास,बीट अंमलदार मोहसीन शेख,जमादार नारायण काकडे घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला.दोघांचेही मृतदेह तलवाड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीस पाठविण्यात आले.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

गडचिरोली जिल्ह्याला ४८ आधार नोंदणी संच प्राप्त; इच्छुक सेवा केंद्र चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आधार नोंदणी व बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाच्या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र...

आता “पोलीस पाटी” अथवा “पोलीस” नाव लिहिलेल्या खासगी वाहनांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील बरेचसे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या खासगी दुचाकी वा चारचाकी वाहनांवर 'पोलीस' असे लाल अक्षरात लिहिणे किंवा तशी पाटी लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!