Monday, September 21, 2026
Homeगडचिरोलीआरमोरीत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते निवासी पट्ट्यांचे वाटप..

आरमोरीत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते निवासी पट्ट्यांचे वाटप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत आयोजित केलेल्या ‘सेवा पंधरवाडा’ उपक्रमादरम्यान “सर्वांसाठी घरे” या मोहिमेला गती देत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते १ ऑक्टोंबर २०२५ रोजी आरमोरी येथील नागरी भागातील ३० व्यक्तींना निवासी प्रयोजनार्थ असलेले पट्टे वाटप करण्यात आले.जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत,१ जानेवारी २०११ पूर्वीचे निवासी प्रयोजनार्थ असलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याची कार्यवाही सुरू आहे.पट्टे वाटपाच्या या कार्यक्रमापूर्वी आरमोरी तहसिलदार यांचे मार्फत मौजा ठाणेगाव,किटाळी,इंजेवारी,देलनवाडी, मोहझरी ऊर्फ सुकारबोडी,मोहटोला ऊर्फ कुकडी,डारली, देऊळगाव,बोडधाचक व आरमोरी या १० गावांतील एकूण २१९ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यात आले आहेत.
पट्टे वाटप कार्यक्रम प्रसंगी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान,आरमोरीच्या तहसिलदार उषा चौधरी,तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम,नायब तहसिलदार हरीदास दोनाडकर,ललीतकुमार लाडे, धनराज वाकुळकर,बेबी बरडे यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी,मंडळ अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी यांचेसह आरमोरी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल...

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!