Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंज२ हजार कोटींच्या आलिशान बंगल्यात राहुन आंबेडकांचे स्वप्न पुर्ण करणे अशक्य- राजरतन...

२ हजार कोटींच्या आलिशान बंगल्यात राहुन आंबेडकांचे स्वप्न पुर्ण करणे अशक्य- राजरतन मेश्राम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त       

देसाईगंज(गडचिरोली):-देशात व मुख्य:ता महाराष्ट्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ तळागळातील वंचित समाज समजु लागला आहे.बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला समाजाच्या सर्वच स्तरातुन पाठिंबा मिळत असल्याने आंबेडकरांच्या नावाचे राजकारण करणारे काही सुपारीबाज पक्ष स्व:ताचे अस्तीत्व टिकवुन ठेवण्यासाठी ‘मिशन’ या नावाखाली समाजाची दिशाभूल करत असले तरी दोन हजार कोटींच्या आलीशान बंगल्यात राहुन आंबेडकरी चळवळ चालविल्या जाऊ शकत नाही,असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे गडचिरोली जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम यांनी व्यक्त केले.
९० च्या दशकात व्ही.पी.सिंगांचे सरकार असतांना मंडल आयोगाची शीफारस करण्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रणेचे ॲड.बाळासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता.कैबिनेट मंत्रीपद नाकारुन बाळासाहेबांनी मंडल आयोग लागु करण्यासाठी व्ही. पी.सिंगांना प्रेरीत केले. मात्र,या देशातील कॉंग्रेस आणि बीजेपी सरकारने मंडल आयोग लागू करु दिला नाही.त्यातच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा नातू म्हणुन देशभरात पक्ष बळकटीचे प्रयत्न न करता ज्या-ज्या राज्यात आंबेडकरांची चळवळ चालविली जात आहे, त्या-त्या राज्यातील चळवळीच्या नेत्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले.मात्र,कालांतराने त्या पक्षांनी भाजपशी हातमिळवणी केली व सत्ता भोगली.मात्र रक्तात खरा आंबेडकरवाद नसल्याने त्यांनी भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबून चळवळ संपुष्टात आणली. २ हजार कोटींच्या आलीशान बंगल्यात राहुन आंबेडकरांच्या नावाने समाजाची दिशाभूल होत असल्याने एकेकाळचा राष्ट्रीय पक्ष असलेल्या तथाकथीत पक्षाने लोकसभेत साधा भोपळा फोडण्याची लायकी ठेवली नाही.खुल्या मंचावरुन भाजपला कशी मदत करता येईल,अशीच रणनिती आखली.उलट बाळासाहेब आंबेडकरांनाच भाजपची ‘बी टिम’ म्हणून असा अपप्रचार केला.मात्र,समाज आता सत्य ओळखु लागला आहे.महाबोधी बुद्ध विहार बोधगया आंदोलन,सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणात थेट सुप्रिम कोर्टात लढा उभारला, नागपुरच्या दिक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्कींग विरोधात आंदोलन,७८ लाख मतदान वाढीचे प्रकरण, मराठा आरक्षणाच्या प्रकरणात ओबीसींचे हक्क अबाधित राहण्यासाठी केलेल्या सुचना यावरुन महाराष्ट्रात बहुजनांची वंचितांची चळवळ खऱ्या अर्थाने फक्त बाळासाहेब आंबेडकरच चालवित आहेत.हे सत्य समजल्याने व ओळखल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात एससी,एसटी,ओबीसी व मुस्लिम समाज बाळासाहेबांना पाठिंबा देत आहेत.तर दुसरीकडे सुपारीबाज पक्ष आंबेडकरी मुव्हमेंट संपविण्यासाठी भाजपचे हस्तक बनुन काम करत आहेत.२ हजार कोटींच्या आलीशान बंगल्यात राहुन फक्त आपल्या परिवारासाठी संम्पत्ती गोळा करता येत असली तरी आंबेडकरी चळवळ चालविता येऊ शकत नाही,असे परखड मत राजरतन मेश्राम यांनी व्यक्त केेले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!