Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरमुसळधार पावसाने पुल तुटला; अनुचित प्रकार टळला..!

मुसळधार पावसाने पुल तुटला; अनुचित प्रकार टळला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावत संपूर्ण जिल्हा जलमय करून सोडला आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.अश्यातच चंद्रपूर शहराला लागून असलेल्या झरपट नदीवरील पुल मुसळधार पावसाने तुटून वाहू लागल्याने पठाणपुरा आणि भिवापूर या दोन महत्त्वाच्या वार्डातील नागरिकांचा थेट संपर्क तुटला आहे.मात्र,पुल तुटत असतांना सदरच्या मार्गावरून रहदारी सुरू नसल्याने एखादा अनुचित प्रकार टळला. सदरचा पुल केवळ वाहतुकीसाठीच नाही,तर चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली यांच्या यात्रेदरम्यान भाविकांसाठीही अत्यंत महत्त्वाचा असून या मार्गावरून मोठ्या संख्येने वाहतूक वळवली जाते,त्यामुळे या पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना केले आहे. त्यासंदर्भात तसे पत्रही दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!