- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये व ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ३० ऑगस्ट २०२५ पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते.मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेले उपोषण सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतर मागे घेतले.यावेळी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला.या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या संघटनांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला.त्यामुळे नागपूरसह विविध ठिकाणी सरकारच्या या निर्णयाची होळी करून मोर्चे काढण्यात आले.मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमास शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी.गुणवंत मुलांमुलीना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती ७५ विद्यार्थ्यांची संख्या वाढवून २०० विद्यार्थी करण्यात यावी.महाज्योती या संस्थेकरिता १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी.बार्टीप्रमाणे महाज्योतीची कामे ओबीसी प्रवर्गातील संस्थेला देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा.म्हाडा व सिडको तर्फे बांधून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत ओबीसी संवर्गाकरिता आरक्षण लागू करण्यात यावे.ओबीसी मुला व मुलींचे वसतिगृह ओबीसी बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरित करावे. ओबीसी,व्हीजेएनटी, एसबीसी आर्थिक विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देणाऱ्या कर्जासाठी फक्त शेती गहाण ठेवण्याची अट काढून टाकावी व इतर मागण्या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते.अश्यातच हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागेल,असा आरोप ओबीसींकडून करण्यात येत होता. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपुरात सुरू केलेल्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी आज,गुरुवार ४ सप्टेंबरला मंत्री अतुल सावे आणि परिणय फुके यांनी भेट दिली व ओबीसी आरक्षणाला गदा येणार नाही,याची काळजी घेतल्याचे सांगत विविध मागण्या सरकारने मान्य केल्या असून,मागण्या संदर्भातील शासन आदेश एका महिन्यात काढला जाईल,असे आश्वासन दिल्यानंतर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी उपोषण थांबवण्याची घोषणा केली आहे.तसेच नागपूर व्यतिरिक्त गोंदिया,भंडारा,लातूर,वडीगोद्री, कल्याण,ठाणे याठिकाणी सुरू असलेले आंदोलन थांबवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देणार आहोत.यापुढे भविष्यात ओबीसीवर कुठल्याही प्रकारची गदा आल्यास,तेव्हा एवढ्याच ताकदीने आपण उभे राहू आणि ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचे रक्षण करू,असे बबनराव तायवाडे म्हणाले.नागपूर येथे सुरू असलेले उपोषण अतुल सावे यांच्या हस्ते थांबवत आहोत,असे म्हणत बबनराव तायवाडे यांनी अतुल सावेंच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण मागे घेतले आहे.
- Advertisement -

