Tuesday, July 14, 2026
Homeनागपूरजनता महागाई,बेरोजगारी आणि इंधन दरवाढीने त्रस्त असतांना सरकारची नुसती इव्हेंटबाजी- विजय वडेट्टीवार

जनता महागाई,बेरोजगारी आणि इंधन दरवाढीने त्रस्त असतांना सरकारची नुसती इव्हेंटबाजी- विजय वडेट्टीवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-देशातील जनता महागाई,बेरोजगारी,इंधन दरवाढ आणि आर्थिक अस्थिरतेने त्रस्त असतांना केंद्रातील सरकार धार्मिक ध्रुवीकरण आणि इव्हेंटबाजीच्या माध्यमातून अपयश लपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.पेट्रोल-डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारीसारख्या मूलभूत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी भाजप हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून समाजात धार्मिक तेढ पसरवत आहे.सरकारकडे जनतेला दिलासा देण्यासाठी कोणतीही ठोस योजना उरलेली नाही.मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलन करीत असतांनाही सरकारकडून केवळ आश्वासनांची धूळफेक केली जात आहे.शासनाकडून जीआर काढले जातात,मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.अनेक ठिकाणी वाहनांचे आरसी बुक पाहून डिझेल दिले जात आहे.शेतकऱ्यांना डिझेलची गरज असतांना अशी परिस्थिती निर्माण होणे गंभीर बाब आहे.काही दिवसांत देशात लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण होऊ शकते.नजीकच्या काळात पेट्रोलचे दर प्रतिलिटर १७० रुपये आणि डिझेलचे दर १५० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.मध्यमवर्गीय,शेतकरी आणि सामान्यांवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!