उद्रेक न्युज वृत्त :-पीएम किसान योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.विहित मुदतीत ई-केवायसी न केल्यास पात्र लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणे बंद होऊ शकतात.त्यामुळे पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी तात्काळ विहित मुदतीत ई-केवायसी करून घ्यावी.यासाठी शासनाने येत्या,३० जून २०२६ पर्यंत हे प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे; अन्यथा विहित मुदतीत ई-केवायसी न केल्यास लाभार्थी पुढील हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहू शकतात.केंद्र व राज्य शासनाने योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.केवळ खऱ्या व जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच योजनेचा लाभ पोहोचावा,हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे.यासाठी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.लाभार्थी शेतकऱ्यांना बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतींनी प्रमाणीकरण पूर्ण करता येईल. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी शेतकरी नजीकच्या सीएससी केंद्रावर जाऊ शकतात.तसेच,शेतकरी स्वतःच्या मोबाईलवर ‘पीएम-किसान’ मोबाईल ॲप डाऊनलोड करून चेहऱ्याद्वारे(फेस ऑथेंटिकेशन) ई-केवायसी पूर्ण करू शकतील.पात्र शेतकऱ्यांनी कोणतीही अडचण टाळण्यासाठी ३० जूनपूर्वी ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी,असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
..अन्यथा पीएम किसानचा लाभ होणार बंद; ३० जून शेवटची तारीख..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

