Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरअज्ञात इसमाने चक्क रेल्वे डब्ब्याच्या शौचालयातच घेतला गळफास..

अज्ञात इसमाने चक्क रेल्वे डब्ब्याच्या शौचालयातच घेतला गळफास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका अज्ञात इसमाने चक्क रेल्वे डब्ब्याच्या शौचालयात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची  घटना काल शनिवारी दुपारच्या सुमारास बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये उघडकीस आल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.११००१ क्रमांकाची नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वे गाडी ही मुंबईहून दुपारी दीडच्या सुमारास बल्लारशाह रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक पाचवर थांबली. नेहमी प्रमाणे रेल्वेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी गाडीतील सफाई करण्यास सुरुवात केली. अश्यातच सफाई कर्मचाऱ्यांनी नंदीग्राम एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक ३ मधील शौचालयाचे दार उघडण्याचा प्रयत्न केला असता,शौचालयाचे दार आतून बंद असल्याचे आढळून आले.त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दार ठोठावून आवाज दिला.बराच वेळ आवाज देऊनही कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी स्टेशन प्रबंधक व रेल्वे जीआरपी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार जीआरपीचे अरविंद शाह व पथक घटनास्थळी दाखल झाले.त्यांनीही दार थाठवून आवाज दिला,मात्र प्रतिसाद न मिळाल्याने शौचालयाचे दार तोडले.आतमध्ये एका इसमाने कपड्याच्या साहाय्याने टाकीच्या पाइपाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. प्रकरणी मृतदेह खाली उतरवून रेल्वे डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.गळफास घेतलेल्या अज्ञात इसमाची अद्याप ओळख पटलेली नसून त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!