उद्रेक न्युज वृत्त :-मराठी मालिका तसेच हिंदी मालिकांमधून अभिनयाची छाप पाडणारी मराठी अभिनेत्री प्रिया मराठे वयाच्या ३८ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड झाली.आज,रविवार ३१ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास मुंबईतील मीरारोड परिसरातील निवासस्थानी प्रिया मराठेने अखेचा श्वास घेतला.ती काही वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होती.उपचार केल्यानंतर मधल्या काळात कर्करोग बरा झाला होता.मात्र, कर्करोगाने पुन्हा डोकेवर काढून उपचार सुरू असतांनाच आज रविवारी प्रियाचा मृत्यू झाला.लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठेने ‘पवित्र रिश्ता’ ‘साथ निभाना साथिया’,’या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ व इतर अशा अनेक मालिकांमधून तसेच नाट्य क्षेत्रातून अभिनयाची छाप पाडली होती.अकरावीमध्ये शिकत असतांनाच प्रियाला महाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि तिथूनच त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात झाली.त्यामुळे अभिनयातील वाढते आकर्षण करिअर म्हणून स्वीकारले आणि अवघ्या ३८ व्या वर्षीच त्यांची शरीराने साथ सोडली.तिच्या जाण्याने मराठी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मराठी अभिनेत्री प्रिया मराठे वयाच्या ३८ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

