- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या जुनोना जंगल परिसरात शेतालगत कुड्याच्या झाडाच्या शेंगा तोडण्यासाठी गेलेल्या वडील आणि मुलावर अस्वलाने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.वडील गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारार्थ नागपूरच्या मेडिकल कॉलेजला हलविण्यात आले आहे.अरुण कुकसे वय ६६ वर्षे हे अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले,तर त्यांचा मुलगा विजय कुकसे हा सुध्धा गंभीर जखमी झाला.
कुड्याच्या झाडाच्या शेंगा तोडण्यासाठी काल शनिवारी अरुण कुकसे व त्यांचा मुलगा विजय कुकसे हे जुनोना जंगल परिसरातील शेतालगत गेले होते. अरुण कुकसे हे शेंगा तोडत असतांनाच अचानकपणे मागून येत अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला.हल्ला चढवताच मुलाने आरडाओरड केली.त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत हातात दगड,काठ्या घेऊन अस्वलाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. अश्यातच विजय कुकसे यानेही अस्वलाच्या जवळ जात लाठ्यांनी मारहाण करत असतांनाच हल्ला चढवला.यात अस्वलही जखमी झाली.घटनेची माहिती वन विभागास मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी अस्वलीला पुढील उपचारासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.
- Advertisement -

