Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरपोलिसांना आली शंका; मुलींची केली विचारपूस.. - घरून पळून आलेल्या निघाल्या दोन...

पोलिसांना आली शंका; मुलींची केली विचारपूस.. – घरून पळून आलेल्या निघाल्या दोन सख्ख्या बहिणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-रेल्वे गाडी येताच दोन मुली रेल्वेस्थानकावर उतरल्या.उतरून इकडे-तिकडे बघून घाबरल्या. अश्यातच रेल्वे स्थानकावर असलेल्या रेल्वे पोलिसांना शंका आली. त्यांनी मुलींची विचारपूस केली असता दोन्ही मुली घाबरलेल्या स्थितीत बोलू लागल्या. त्यानुसार विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर त्या सख्ख्या बहिणी असल्याचे कळले.त्यातील लहान बहीण ही १५ वर्षे वयाची असल्याने पोलिसांना धक्काच बसला.सदरची घटना ही चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारशाह रेल्वे स्थानकावर घडली असून काल बुधवारी सर्वत्र उघडकीस आली. प्रकरणी दोन सख्ख्या बहिणींना बल्लारशाह रेल्वे पोलिसांनी चाइल्डलाइनच्या मदतीने बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले.दोन सख्ख्या बहिणी उत्तर प्रदेशातील महाराणी गंज येथून घरून पळून विनातिकीट ट्रेनमध्ये बसून दिल्लीकडे जाण्यास निघाल्या.परंतु, तेलंगणात पोहोचल्यानंतर संघमित्रा सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीत बसून दिल्लीच्या दिशेने जाण्यासाठी निघाल्या असता बल्लारशाह स्थानकावर उतरल्या.रेल्वे स्थानकावर उतरताच रेल्वे पोलिसांच्या समयसूचकतेने
दोन्ही मुली सुखरूप असून मुलींची वैद्यकीय तपासणी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून चंद्रपूर बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले आहे.त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क साधून त्यांच्या हवाली करण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!