Thursday, May 28, 2026
Homeदेसाईगंजआमदार रामदास मसराम यांच्या ५६ व्या वाढदिवस दिनानिमित्त ५६ रक्तदात्यांनी केले रक्तदान.....

आमदार रामदास मसराम यांच्या ५६ व्या वाढदिवस दिनानिमित्त ५६ रक्तदात्यांनी केले रक्तदान.. – आज विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-शेतकऱ्यांचे कैवारी तथा गोर-गरीब सर्वसामान्य जनतेच्या मनात घर करणारे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या ५६ व्या वाढदिवस दिनाचे औचित्य साधून आज,गुरुवार २१ ऑगस्ट रोजी देसाईगंज शहरात ५६ रक्तदात्यांनी रक्तदान करून विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.सकाळच्या सुमारास शहरातील आमदार मसराम यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर वृक्षारोपण कार्यक्रम,सकाळी १० वाजता ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे रुग्णांना फळवाटप तर सकाळी ११ वाजे पासून माता वार्डातील माता मंदिर सभागृहात तब्बल ५६ रक्तदात्यांनी रक्तदान करून आमदार मसराम यांचा वाढदिवस साजरा केला.
आमदार मसराम यांचा ५६ वा शुभेच्छा विशेष  वाढदिवस उद्या,शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी देसाईगंज शहराच्या साई मंदिर परिसर हनुमान वार्डातील त्यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे.
प्रसंगी आज गुरुवारी विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आलेल्या वाढदिवस दिनी देसाईगंज पंचायत समितीचे माजी सभापती परसराम टिकले,माजी उपसभापती नितीन राऊत,देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले,आरमोरी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे,जिल्हाउपाध्यक्ष दिलीप घोडाम,ज्येष्ठ नेते राजू रासेकर,भाष्कर डांगे, विक्की रामानी,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अमर भर्रे, कमलेश बारस्कर,कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत,उपसरपंच सुरेश तोडफोडे,विक्की साधवानी,सेवादल अध्यक्ष दुष्यांत वाटघुरे,धनपाल मीसार,आकाश ढोरे,नितेश अवसरे,रजनी आत्राम,वैष्णवी आकरे,सुधाकर राऊत,जगदीश शेंदरे,प्रा.पंकज धोटे, मोरू आर्ट संचालक मोरू मोहुर्ले,देवनाथ सयाम,स्वप्नील मीसार,गौरव शिलार,ज्ञानेश्वर मेश्राम,मनोहर निमजे, शैलेश बगमारे,प्रमोद पत्रे,परसराम ठाकरे,हरीश ठाकरे, उर्मिला लोणारकर सह पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहा वर्षांपेक्षा जास्तकाळ कार्यरत असलेल्या इतर अनेक अभियंत्यांची यादी उपलब्ध असतांना केवळ मलाच लक्ष्य केले जाते.. – कोरचीतील नाडेकल पुलाशी संबंध नसल्याचा कार्यकारी अभियंता...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात भ्रष्टाचार,अनियमितता तसेच नाडेकल पुलाच्या बांधकामासंदर्भात माध्यमातून प्रसिद्ध आरोप निराधार असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे कार्यकारी...

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!