Thursday, April 30, 2026
Homeदेसाईगंजअखेर देसाईगंज नगरपरिषद प्रशासनाने आपच्या महानिवेदनाची घेतली दखल- विविध विकास कामांना झाली...

अखेर देसाईगंज नगरपरिषद प्रशासनाने आपच्या महानिवेदनाची घेतली दखल- विविध विकास कामांना झाली सुरुवात..  

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

 देसाईगंज  :- आम आदमी पक्षाच्या वतीने मागील काही दिवसांपूर्वी देसाईगंज शहरातील व स्थानिक नगर परिषद क्षेत्रातील विविध प्रभागात मोठ्या प्रमाणावर समस्यांचा डोंगर उभा येऊन ठाकला असल्याचे महानिवेदन सादर केले होते.गाढ झोपेत असलेल्या प्रशासनास जागे करून आपचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवानी व आपचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी महानिवेदनाच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण करण्यासाठी पत्रकाद्वारे मागणी केली होती.आपने मागणी केलेल्या महानिवेदनाची दखल घेऊन अखेर देसाईगंज नगरपरिषद प्रशासनाने विकास कामे करण्याचा सपाटा चालवला आहे.

आपने दिलेल्या निवेदनात,नगरपरिषद क्षेत्रातील विविध प्रभागात उद्यान,नाली सफाई,नाली बांधकाम, नवीन नळ जोडणी,क्रीडांगण,विद्युत पोल,हायमाष्ट पथदिवे  व इतर समस्या बाबत नगरपरिषद प्रशासनास जागे केले होते.कित्तेक वर्षांपासून केवळ पोकळ आश्वासने देण्याचे काम सुरू होते.हीच बाब प्रकाश जीवनी यांच्या लक्षात येताच झोपी गेलेल्या प्रशासनास जागे करणे गरजेचे असल्याने महा निवेदनाच्या माध्यमातून उघड केल्याने नगरपरिषद प्रशासन जागे होऊन देसाईगंज शहरातील नंन्दनवन  कॉलनी व हेटी तुकुम वार्डापासुन नगर परिषदने नवीन पोलसाठी पाहणी करुण पोल लावण्याची सुरुवात केली आहे.तसेच इतरही बाबींवर लवकरात-लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याने आपच्य प्रयत्नांना यश मिळाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!