Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरदुचाकीसह सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी केले गजाआड..!

दुचाकीसह सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी केले गजाआड..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका घटनेत घरी कुणीही नसल्याची संधी साधून सोन्याचे दागिने,तर दुसऱ्या घटनेत एकाची दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांकडून दोन्ही प्रकरणात एकूण २ लाख ८१ हजार ७७६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत चंद्रपूर शहर पोलिसांनी दोघांना गजाआड केले आहे.सुमित शांताराम अम्राजवार वय २८ वर्षे व नवीर कदीर बेग वय २३ वर्षे,अशी अटकेतील आरोपींची नावे असून दोघेही चंद्रपूर शहराच्या भंगाराम वार्डातील रहिवासी आहेत.
पहिल्या घटनेत,तक्रारदार महिला ही चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्डातील प्रांतीक कॉलनी येथे वास्तव्यास आहे.ती ११ ऑगस्ट रोजी बाहेरगावी नातेवाईकांकडे  गेली होती.अश्यातच गावाहून १४ ऑगस्ट रोजी परत आली असता कुलूपबंद असलेले घराचे दार उघडे दिसले व घरातील साहित्य अस्ताव्यस्त पाहून लागलीच तिने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.त्यानुसार अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३),३३१(४),३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.प्रकरणी शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.त्यानुसार सुमित अम्राजवार व नवीर बेग या दोघांना ताब्यात घेत विचारपूस केली असता,त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल केली.पोलिसी खाक्या दाखवताच दोघेही पोपटासारखे बोलू लागले.त्यातच दुसऱ्या प्रकरणातील शहराच्या भिवापुर वार्डातील रहिवासी असलेले नारायण चिल्लकेवार यांची दुचाकी शनिवार १६ ऑगस्ट रोजी चोरीला गेल्याची तक्रार होती.सदर दुचाकीही त्यांनीच चोरी केल्याची कबुली दिल्याने दोन्ही प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांच्याकडून २ लाख ६१ हजार ७७६ रुपये किंमतीचे ३२.७३० ग्रॅम सोन्याचे दागिने व २० हजार रुपये किंमतीची एमएच ३४ एझेड २०५३ क्रमांकाची दुचाकी हस्तगत करण्यात आली.
सदर कारवाई चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे,विलास निकोडे,पोलीस हवालदार सचिन बोरकर,लक्ष्मण रामटेके,भावना रामटेके,निकेश ढेंगे,नाईक पोलीस शिपाई कपुरचंद खरवार,पोलीस अंमलदार जावेद सिध्दीकी, योगेश पिदुरकर,रुपेश पराते,विक्रम मेश्राम,सारीका गौरकार,दिपिका झिंगरे आदींनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!