Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरमारहाण करून जोरदार धक्का; तरुणाचा मृत्यू..! -आरोपी अटकेत.

मारहाण करून जोरदार धक्का; तरुणाचा मृत्यू..! -आरोपी अटकेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील तुकडोजी नगर परिसरात काल,मंगळवार १२ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. नागरिकांनी सदरची माहिती कोरपना पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत मृतदेहाची ओळख पटविली.आढळून आलेला मृतदेह हा कोरपना तालुक्याच्या तुळशी येथील २४ वर्षीय विश्वास नरेंद्र मालेकर या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले.त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या.सुनील पवार वय २३ वर्षे,रा.पारधीगुडा, ता.कोरपना,जि.चंद्रपूर असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अन्वये खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.आरोपी सुनील पवार याने जुन्या वैमनस्यातून झालेल्या वादात  विश्वास याला मारहाण केली.मारहाण करीत असतांनाच जोरदार धक्का दिल्याने विश्वासच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला.या बाबत कुणालाही कळू नये,म्हणून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.अश्यातच पोलिसांनी तपास यंत्रणा कामी लावून भांडाफोड केला.घटनेचा पुढील तपास तपास एसडीपीओ रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनील गाडे यांच्या नेतृत्वात पीएसआय देवानंद केकन,पोलिस कर्मचारी साईनाथ जायभाये,प्रभाकर जाधव सह कोरपना पोलिस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!