Friday, September 11, 2026
Homeभंडाराकाय सांगता..? रोजगार हमी योजनेच्या तीन कंत्राटी तांत्रिक सहाय्यकांनी ५७ लाख ८९...

काय सांगता..? रोजगार हमी योजनेच्या तीन कंत्राटी तांत्रिक सहाय्यकांनी ५७ लाख ८९ हजार ३५२ रुपयांवर मारला डल्ला.. – २० दिवसांत रक्कम परत करा; अन्यथा फौजदारी कारवाईचे आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विविध ग्रामपंचायतीत तब्बल ५७ लाख ८९ हजार ३५२ रुपयांवर तीन कंत्राटी तांत्रिक सहाय्यकांनी मिळून डल्ला मारल्याचा अचंभित करणारा प्रकार उघड झाल्याने तिघांनाही भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांनी तात्काळ सेवा समाप्तीचे आदेश देऊन घरी बसवले आहे.अश्यातच तिघांनाही सदर रक्कम २० दिवसांत परत करण्याचा कालावधी दिलेला आहे.रकमेचा भरणा न केल्यास फौजदारी कारवाई करण्याचेही आदेश दिले गेले असल्याने तिघांनाही मोठा घाम फुटला असल्याची चर्चा आहे. युवराज बारई,रविकांत तिडके आणि महेश निमजे अशी कंत्राटी तांत्रिक सहाय्यकांची नावे असून रविकांत तिडके याने ३० लाख ३० हजार ६७० रुपये,युवराज बारई याने २० लाख २४ हजार ७३२ रुपये तर महेश निमजे याने ७ लाख ३३ हजार ९५० रुपये,असे तिघांनी मिळून एकूण ५७ लाख ८९ हजार ३५२ रुपयाचे घबाड केले आहे.विशेष म्हणजे,मोहाडी पंचायत समितीत पाणंद रस्त्याच्या कामाबाबत अनेक तक्रारी असून यात बनावट हजेरी लावणे,घरोघरी जाऊन मजुरांकडून पैसे वसूल करणे,यंत्राने कामे करणे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अश्यातच रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील कामामध्ये अनियमितता, शासकीय रकमेचा अपहार करणे,शासकीय कर्तव्यात कसूर करणे,वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे, जाणीवपूर्वक कामात हयगय करणे असा ठपका ठेवण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!