- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने प्रकरणास वाचा फुटली.प्रकरणी ४५ वर्षीय
आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल रा.साकोली(शहर) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ६४(२)(१),६५(१) तसेच पोस्को(POSCO) कायदा व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सध्या डॉक्टर फरार असून,साकोली पोलिसांकडून शोध सुरू आहे.घटनेमुळे साकोली शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी दोन दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवारी आपल्या आईसोबत साकोली येथील एका खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. डॉक्टरांनी सोनोग्राफी आवश्यक असल्याचे सांगत, मुलीच्या आईला व नर्सला बाहेर थांबण्यास सांगितले. त्यानंतर सोनोग्राफी कक्षात कथित स्वरूपाचे गैरवर्तन झाल्याचा आरोप आहे.सोनोग्राफीनंतर रुग्णालयाच्या बाहेर आल्यानंतर पीडित मुलीने आपल्या आईला झालेल्या प्रकाराची माहिती दिली.त्यानंतर घरी परतल्यावर मुलीने घडलेला प्रकार वडिलांनाही
सांगितला. डॉक्टर इतक्यावरच थांबला नाही तर मुलीला संपर्क क्रमांक मागितला व याबाबत कोणालाही सांगू नये,असेही बजावले.तसेच यापूर्वीही इंस्टाग्रामवरून संबंधित डॉक्टरकडून पीडितेला फ्रेंड रिक्वेस्ट आल्याचा दावा करण्यात आला आहे.तक्रार होताच डॉक्टरने पलायन केले.साकोली पोलीस प्रशासन त्याच्या मागावर असून लवकरच अटक केली जाईल,असे साकोली पोलिसांचे म्हणणे आहे.
- Advertisement -

