Wednesday, July 15, 2026
Homeदेसाईगंजकोकडी येथे मोफत नेत्ररोग तपासणी तथा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न..

कोकडी येथे मोफत नेत्ररोग तपासणी तथा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-नागरिक आरोग्य रक्षक संस्था देसाईगंज व विनायक शिक्षण संस्था विसोरा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मे नेत्रपेढी नेत्र रुग्णालय नागपूर व वोलकार्ट फाउंडेशन इंडियन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त सहकार्याने देसाईगंज तालुक्याच्या कोकडी येथील धनंजय नाकाडे माध्यमिक आश्रम शाळेत मोफत नेत्ररोग तपासणी तथा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर नुकताच संपन्न झाला.आयोजित शिबिरात एकूण ११० रुग्णांची तपासणी करण्यात आली,तर ४२ रुग्णांची पुढील शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.त्यांची शस्त्रक्रिया नागपूर येथील महात्मे रुग्णालय येथे करण्यात येणार आहे.सदर शिबिराचे आयोजन विनायक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नाना नाकाडे,नागरिक आरोग्य रक्षक संस्थेचे सचिव लतीफ शेख  यांनी केले.शिबिरात महात्मे रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टर निधी मांडवकर,प्रफुल वकुंडे,हुरिया शेख, सम्यक नाईक,रितू सेलोटे,विजय पांडे इत्यादींनी सेवा दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र नाकाडे,धनंजय नाकाडे माध्यमिक आश्रम शाळा कोकडी,शाळेचे सर्व शिक्षकवृंद तथा कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!