Sunday, September 6, 2026
Homeचंद्रपूरशेतावर कामासाठी गेला; पण परतलाच नाही..! - १८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू..

शेतावर कामासाठी गेला; पण परतलाच नाही..! – १८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-शेतीचे पावसाळी हंगाम सुरू झाल्याने शेतीच्या कामांची लगबग वाढली आहे.शेतकरी शेतीची कामे करण्यासाठी शेतशिवारात जात आहेत. अश्यातच शेतात कामे करीत असतांनाच सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे.काही ठिकाणी झाडे उन्मळून पडत आहेत.तर काही ठिकाणी शेतातील विजेचे खांब विद्युत तारेसह खाली पडत आहेत.अश्याच प्रकारे काल मंगळवारी कोरपना तालुक्याच्या सावलहिरा गाव परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत खांब पडले.त्यात शेतकरी प्रफुल जोगी यांच्याही शेतातील विद्युत खांब तारेसह पडलेले होते.त्यातच प्रफुल जोगी यांचा १८ वर्षीय मुलगा आनंद जोगी आज,बुधवार २५ जून रोजी शेतावर काही कामे करण्यासाठी गेला असता,काल मंगळवारी वादळामुळे पडलेल्या विद्युत खांबांच्या तारेचा विद्युत पुरवठा खंडित असल्याचे गृहीत धरून त्याने काम सुरू केले.यादरम्यान,तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती गावकऱ्यांना कळताच घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती पोलीस प्रशासनास देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून मृतदेह कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!