Sunday, September 6, 2026
Homeमुंबईबापरे.! चक्क पाहुण्यांच्या जेवणासाठी ताट,चमचे, वाट्या व ग्लास चांदीचे; एका थाळीचे जेवण...

बापरे.! चक्क पाहुण्यांच्या जेवणासाठी ताट,चमचे, वाट्या व ग्लास चांदीचे; एका थाळीचे जेवण ४ हजार ५५० रुपये.. – बरं झालं ताटात जेवायला सोने दिले नाहीत- खासदार संजय राऊत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-नुकताच संसद व राज्य विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांचा दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा काल मंगळवारी मुंबईत समारोप झाला.संसद व विधिमंडळाची अंदाज समिती ही प्रामुख्याने सरकारला काटकसरीचा सल्ला देते.पण,याच समितीच्या अध्यक्ष व सदस्यांच्या दोन दिवसांच्या जेवणावर चांदीच्या थाळीचा वापर करून त्यावर लाखोंचा खर्च करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.लक्षवेधनारी बाब म्हणजे, काटकसरीवर चर्चा करण्यासाठी आलेल्या पाहुण्यांच्या जेवणासाठी ताट,चमचे,वाट्या व ग्लास हे चक्क चांदीचे होते. पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था निखील केटरर्सकडे होती.यासाठी चांदीची भांडी भाड्याने आणली होती.एका ताटाचे दिवसाचे भाडे ५५० रुपये होते.तर एका थाळीचा दर ४ हजार रुपये होता. विधिमंडळातील अधिकाऱ्यांनीच याची पुष्टी केली आहे.भोजनात कोथिंबीर वडी,मालवणी करी,सुरमई फ्राय,दहीवडे, बटाट्याची भाजी व पुरण पोळी असा माठी मेन्यू होता.एकीकडे राज्य कर्जाच्या खाईत असतांना मुंबईत अंदाज समितीच्या सदस्यांना चांदीच्या ताटातून जेवण दिले जाते.राज्याच्या तिजोरीत खडखडाट असतांना चांदीच्या ताटात जेवण देण्याची काही गरज होती कां? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.तर उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘बरं झालं चांदीच्या ताटात सोने जेवायला दिले नाहीत तर’..अशी टीकेची तोफ डागली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी  नाही,धानाचा बोनस नाही, गरीब,शेतकरी,सामान्य जनतेला त्यांचे हक्काचे पैसे सरकार देत नाही आणि अंदाज समितीच्या बैठकीला येणाऱ्यांसाठी मात्र चांदीच्या ताटात जेवण दिले जाते. सर्वसामान्य जनता महागाईच्या वणव्यात होरपळत असतांना राज्यकर्ते उधळपट्टीत लागले,असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!