Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरअवैध रेती कारवाईच्या धास्तीने ट्रॅक्टर मालक मरता- मरता वाचला; गावकऱ्यांनी वाचवले प्राण..

अवैध रेती कारवाईच्या धास्तीने ट्रॅक्टर मालक मरता- मरता वाचला; गावकऱ्यांनी वाचवले प्राण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-अवैधरित्या रेती चोरी करून वाहतूक करणे हे काही रेती तस्करांचे फॅशन झाले आहे.सतत रेतीची चोरी करणाऱ्यांना मुभा दिली जाते.तर एखादेवेळी ‘चला एक ट्रीप रेती आणूनच पाहू’ म्हणणाऱ्यांना कारवाईच्या कचाट्यात पकडल्या जाते.ही वास्तविकता आहे. अश्यातच चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यात अवैध रेती वाहतूक प्रकरणी एक धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.एका ट्रॅक्टर मालकाचा महसूल विभागाने अवैध रेतीचा ट्रॅक्टर पकडला.ट्रॅक्टर पकडताच आता लाख रुपये कुठून भरावे,या विवंचनेत सापडून त्याच्या मनात कारवाईची धास्ती निर्माण झाली. कारवाईच्या धास्तीने चक्क ट्रॅक्टर मालकाने जवळच असलेल्या विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविण्याचा बेत आखला आणि चक्क विहिरीतच उडी मारली. मात्र,महसूल पथकातील अधिकारी आणि उपस्थित नागरिकांनी तात्काळ आरडाओरड केल्याने गावकऱ्यांनी धाव घेत त्याला विहिरीतून बाहेर काढल्याने ट्रॅक्टर मालक मरता-मरता वाचला असल्याची घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी सायंकाळी वरोरा तालुक्याच्या वडगाव गावाजवळ घडली.प्रणय गारघाटे असे विहिरीत उडी मारलेल्या ट्रॅक्टर मालकाचे नाव आहे.
घटनेच्या दिवशी महसूल विभागाला अवैधरीत्या रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, बामर्डा-वडगाव रस्त्यावर एक विनापरवाना ट्रॅक्टर अडवले. वाहतूक पास तपासणी केली असता ट्रॅक्टरमालक आणि चालकाकडे कागदपत्रे आढळून न आल्याने कारवाई सुरू करण्यात आली.दरम्यान, भीतीने प्रणय गारघाटे याने जवळ असलेल्या विहिरीत उडी घेतली.वेळीच गावकऱ्यांनी धाव घेतल्याने गारघाटे याचे प्राण वाचविण्यात यश आले.मात्र,कारवाईच्या धास्तीने जीव गेला असता तर यांस जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शासनास अवैध रेती चोरी प्रकरणी कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्या जात आहे,तर काही रेती चोर नवनवीन फंडे वापरून पळवाटा शोधू लागलेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!