Sunday, September 6, 2026
Homeचंद्रपूरघरगुती वादातून पत्नीने पतीचा रुमालाने आवळला गळा..

घरगुती वादातून पत्नीने पतीचा रुमालाने आवळला गळा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-दारूच्या आहारी गेलेल्या व सततचे भांडण करून कीटकीट लावणाऱ्या पतीचा रागाच्या भरात पत्नीने रुमालाने गळा आवळून वचपा काढल्याची घटना आज,रविवार १५ जून रोजी सिंदेवाही तालुक्यातील जामसाळा (नवीन)येथे पहाटेच्या सुमारास घडली.दुर्वास बाबुराव चौधरी असे मृत पतीचे नाव आहे,तर ३२ वर्षीय वैशाली दुर्वास चौधरी असे आरोपी पत्नीचे नाव आहे.घटनेबाबत मृतकाची ७० वर्षीय आई सुनंदा बाबुराव चौधरी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपी पत्नी विरोधात  सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक- २१०/२०२५ अंतर्गत कलम १०३(१),११५ (२),३५२ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दुर्वास चौधरी हा नेहमी दारू पिऊन पत्नीशी भांडण करायचा.घटनेच्या एक दिवसापूर्वी त्याने दारूच्या नशेत जोरदार भांडण केले.त्यामुळे पत्नी वैशाली पतीच्या रोजच्या कीटकीटीला वैतागली होती. अश्यातच आज रविवारी पहाटेच्या सुमारास भांडणाचा वचपा काढण्याचे ठरवले आणि रागाच्या भरात झोपेत असलेल्या पतीचा रुमालाने गळा दाबून खून केला.प्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!