Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरघृणास्पद.! चक्क नऊ वर्षाच्या मुलीसोबत ग्रामसेवकाचे लैंगिक चाळे..

घृणास्पद.! चक्क नऊ वर्षाच्या मुलीसोबत ग्रामसेवकाचे लैंगिक चाळे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-एका ४२ वर्षीय ग्रामसेवकाने मुलांसोबत खेळत असतांना नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.प्रकरणी ग्रामसेवकावर उमरेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ७४,७५(१), सहकलम पोक्सो १०,१२ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण या कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.भारत मधुकर चव्हाण वय ४२ वर्षे,रा.उमरेड असे आरोपीचे नाव असून,तो भिवी महालगाव,ता.भिवापूर,जि.नागपूर येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत होता.
घटनेच्या दिवशी रात्री आठ वाजेच्या सुमारास पिडीत चिमुकली व लहान मुले घराबाहेर असलेल्या चिंचेच्या झाडाखाली खेळत होते.अश्यातच आरोपी भरत चव्हाण तिथे गेला. व त्याने मुलीच्या शरीराला मागून, पुढून व छातीला चुकीच्या पद्धतीने हात लावल्याची  बाब पीडित मुलीने आपल्या आईजवळ सांगितली. शिवाय,याबाबत कुणाला सांगितल्यास तुला मारून टाकेन,अशीही धमकी आरोपीने दिल्याची बाब पीडितेने आईजवळ व्यक्त केली.त्यानंतर पीडितेच्या आईने पोलिस स्टेशन गाठत घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला व गुन्ह्याची तक्रार नोंदविली.त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून पुढील प्रक्रिया पार पाडली.याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन, पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भाग्यश्री कुलकर्णी करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!